Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Solapur › तेलगू, मराठी साहित्यातील सेतू हरपला; डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन

तेलगू, मराठी साहित्यातील सेतू हरपला; डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन

Published On: Feb 23 2018 8:24PM | Last Updated: Feb 23 2018 9:04PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

तेलगू व मराठी साहित्यातील दुवा म्‍हणून ओळखले जाणारे ज्येष्‍ठ साहित्यिक, कवी डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन झाले. आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी सोलापुरातील राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. बोल्‍ली यांनी लिहलेले 'एका साळीयाने' हे आत्‍मचरित्र गाजले होते. 

लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली हे गत ५० वर्षांपासून साहित्याची सेवा करीत होते. मुळचे तेलगू भाषिक असूनही त्यांनी मराठी साहित्यात स्‍वत:चे वेगळे स्‍थान निर्माण केले होते. या कार्यातूनच त्यांनी मराठी आणि तेलगू भाषेत ऋणानुबंध निर्माण केला. 

बोल्‍ली यांच्या साहित्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कतृत्‍वाबद्दल आंध्र प्रदेशातील पोट्टी श्रीरामुलू विद्यापीठाने त्यांना मानाची डी.लिट. देऊन गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने पूर्व भागातील साहित्य क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.