Thu, Jan 17, 2019 11:20होमपेज › Solapur › शिक्षकांच्या बदल्या जि.प. स्तरावर

शिक्षकांच्या बदल्या जि.प. स्तरावर

Published On: Aug 08 2018 10:31PM | Last Updated: Aug 08 2018 10:23PMसोलापूर : प्रतिनिधी

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे विस्थापित झालेल्या व अन्यायग्रस्त झालेल्या शिक्षकांना जिल्हा स्तरावरच बदली आदेश दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जि.प. प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना दिले. 

महाराष्ट्र शासनाच्या 27 फेब्रुवारी 2017  च्या  जी.आर.नुसारवऑनलाईन संगणकीय  प्रणालीद्वारे  सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने बर्‍याच शिक्षकांच्या बदल्या गैरसोयीच्या झालेल्या होत्या. या अनियमिततेत नियमितता आणण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व सचिव असिम गुप्ता यांच्यात मध्यस्थी करून  या सर्व आदेशांमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी शासनाची मान्यता मिळवून दिली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दीडशे ते  दोनशे शिक्षक बदल्यांच्या आदेशात दुरुस्ती करून सोय केल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली.        
शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील साधारणपणे दोनशे शिक्षकांच्या सोयीनुसार   दुरुस्तीने बदली आदेश काढले  असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारूड यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास सांगितले. 

या शिष्टमंडळात सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन वीरभद्र यादवाड, दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे-डोगे, काशीनाथ विजापुरे,  वैरागचे ज्ञानेश्‍वर जाधव, रब्बीलाल मुल्ला, सतीश वाले, पूर्णानंद घेरडी, राजकुमार बिज्जरगी, शाहू पवार, चांद शेख, इक्बाल  परंडे, संगमेश्‍वर  येळेगाव, धनराज थिटे, प्रवीण घोडके व नामदेवराव सुरवसे आदी उपस्थित होते.