Wed, Apr 24, 2019 11:39होमपेज › Solapur › निरा उजवा कालव्यालगत शेतीसाठी उचल पाणी परवाने द्यावेत : शेतकर्‍यांची मागणी

निरा उजवा कालव्यालगत शेतीसाठी उचल पाणी परवाने द्यावेत : शेतकर्‍यांची मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिलीव : वार्ताहर

निरा उजवा कालव्यातून सायफन करुन पाणी चोरी करणार्‍या शेतकर्‍यांवर दंडात्मक कारवाई करून शेतकर्‍यांच्या उतार्‍यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतेच दै. पुढारीने वृत्त प्रकाशीत करून या पाणी चोरीवर प्रकाश टाकला होता. 

दै. पुढारी च्या त्या बातमीची दखल घेऊन निरा-उजवा कालवा विभागाने ही कारवाई सुरूकेली आहे.  निरा उजवा कालव्यास संपूर्णपणे अस्तरीकरण झाल्यामुळे लगतच्या विहिरींना पाझराचे पाणी मिळत नाही. त्यामुळे काही मोठ्या शेतकर्‍यांनी 10 ते 12 किमी आंतरापर्यत पाईपलाईन करून विहिरीला जागा विकत घेवून पाणी नेले आहे. निरा- उजवा कालव्यावर अवंलबुन असणारी शेती नापीक झाली आहे. अस्तरीकरणामुळे लगतच्या विहिरीना पाझर स्त्रोत बंद झाला आहे. त्यामुळे पाटकर्‍यांना किंवा त्यांच्या  सहाय्यकांना पाण्यासाठी चिरीमिरी द्यावी लागते. त्यामुळे शासनाने मागेल त्याला उचल पाणी परवाने द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

सांगोला, पंढरपूर भागातील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळावे , पाझरून जाणारे पाणी वाया जावू नये म्हणून पंढरपूरसह माळशिरस व सांगोला तालुक्याच्या हद्दीतील कालव्याला अस्तरीकरण केले आहे. पण पाझराच्या पाण्यावर पिकणारी लगतची शेती अडचणीत आली आहे. म्हणून शेतकर्‍यांना पाणी पट्टी आकारुन पाणी उचलण्यास परवाने द्यावेत व शेतकर्‍यांचा पैसा कोणाच्या तर खिशात जाण्यापेक्षा पाणी पट्टी आकारुन शासनाच्या तिजोरीत जमा होईल याची व्यवस्था करावी अशा सुचना शेतकरीच करू लागले आहेत.तसेच आस्तरिकरण होवू नये म्हणून शेतकरी न्यायालयात गेले आहेत मात्र अस्तरीकरण करण्यास  स्थगिती देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे शेतकरी सायफन टाकून नाईजास्तव पाणी वापरत असलेचे सांगितले जात आहे.

Tags : Solapur, Solapur News, punitive action, against, farmers, steal, water, siphon, right canal


  •