Fri, Feb 22, 2019 03:40होमपेज › Solapur › कल्याणनगरात तलवार हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

कल्याणनगरात तलवार हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

कल्याणनगरामध्ये मागील भांडणाचा राग मनात धरून केलेल्या तलवार    हल्ल्याप्रकरणी 12 जणांविरुध्द विजापूर  नाका पोलिस ठाण्यात   खुनाचा   प्रयत्न  केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज शिंदे (रा. मंजुनाथनगर, सोलापूर), संदेश सूर्यवंशी (रा. कल्याणनगर, सोलपूर), शिवम उर्फ शिवा विठ्ठल जाधव (रा. सलगर वस्ती, सोलापूर), शुभम सर्वगोड (रा. सहयोगनगर, सोलापूर) व इतर 8 जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर शिवाजी शिंदे (वय  23, रा. मूकबधिर शाळेजवळ, कल्याणनगर भाग 1, सोलापूर) याने फिर्याद दाखल केली आहे.

15 मार्च रोजी पंकज शिंदे व त्याच्या  काही  मित्रांना  नशापाणी करीत  असताना   सागर  शिंदे याने त्यांना नशा पाणी  करायचे नाही, अशी  ताकीद  दिलेली  होती.  मंगळवारी दुपारी सागर शिंदे व त्याचे नातेवाईक हे राहत्या घरी जेवण करीत होते. पूर्वीचा राग धरून पंकज शिंदे व त्याच्या साथीदारांनी सागर यास ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, सत्तूर घेऊन सागर याच्या घराजवळ दहशतीचे वातावरण निर्माण करुन सागर याच्या वडिलांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिध्दू विठ्ठल मुडे हे सागरच्या वडिलांना वाचविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना तलवारीचा वार लागला व त्यांचा हात तुटला. त्याचप्रमाणे या माराहणीवेळी   सागरचे  वडील शिवाजी, त्याच्या मामाचा मुलगा रोहित गवळी, मामा परशूराम गवळी यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनासुध्दा मारहाण करुन जखमी करण्यात आले. सागर शिंदे याच्या घराचा पत्ता न सांगितल्याने पंकज शिंदे व इतरांनी संकेत टवळ याच्या डोक्यातही तलवारीने वार करुन त्यास गंभीर जखमी केले व सोनू जावीर यास मारहाण  केली. सोनू जावीर याच्याकडील मोबाईल घेऊन पंकज शिंदे याने मोबाईलवरून सागर याचा भाऊ अविनाश यास फोन करुन तुम्ही आज वाचलात नंतर पाहून घेतो, अशी धमकी दिली म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक उशिरे तपास करीत आहेत.