Wed, Dec 19, 2018 22:09होमपेज › Solapur › सन्मती सेवा दलाच्या संचालकांचा शपथ ग्रहण समारंभ 

सन्मती सेवा दलाच्या संचालकांचा शपथ ग्रहण समारंभ 

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 20 2018 11:36PMअकलूज : तालूका प्रतिनिधी

श्री सन्मती सेवा दलाच्या   नूतन संचालक मंडळाचा शपथ विधी  संपन्न झाला. डॉ. राजेश शहा यांची नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे  संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी सांगितले. 
यावेळी उपाध्यक्ष प्रा. मनीष शहा, सचिव प्रशांत दोशी, सहसचिव सत्यजीत दोशी, खजिनदार महेश दावडा, सहखजिनदार संजय दोशी, प्रसिध्दीप्रमुख अक्षय दोशी, सहप्रसिध्दी प्रमुख नितेश दोशी  यांची निवड करण्यात आल्याचे गांधी सांगितले.

मिहीर गांधी यांनी नूतन संचालक मंडळास शपथ दिली. यावेळी मावळते अध्यक्ष नवजीवन दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्षभरातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. 
जैन समाजातील विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार, सन 2017-18  संचालकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार विरकर, उपाध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी, नगरसेवक धनाजी माने, गणेश रसाळ, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, रा. स.प अध्यक्ष आप्पासाहेब कुकडे, डॉ. प्रमोद गावडे, युवराज सूर्यवंशी, जवाहरलाल गांधी, डॉ. श्रेणीक शहा, मंगेश दोशी, डॉ. राजेंद्र मोडासे, मानदेशी महिला बँक चेअरमन चेतना सिन्हा आदी उपस्थित होते.

 

Tags : Swearing Ceremony, Directors of the Communications Service, Akluj, Solapur