Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Solapur › इर्लेवाडीत व्यापार्‍याचा संशयास्पद मृत्यू

इर्लेवाडीत व्यापार्‍याचा संशयास्पद मृत्यू

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 28 2018 10:50PMवैराग : प्रतिनिधी 

अंतरगाव (ता. भूम) येथील एका 52 वर्षीय जनावरांचा व्यापार करणार्‍यारे विश्‍वनाथ रंगनाथ मोरे (वय 55,  रा. अंतरगाव, ता. भूम) यांनी इर्लेवाडी (ता. बार्शी) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी मात्र या व्यापार्‍याचा तिघांनी मिळून खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

यासंदर्भात मृताचा भाऊ हनुमंत रंगनाथ मोरे यांनी वैराग पोलिसांत तक्रार दिली आहे. वैराग पोलिसांत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवार, 28 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील  विश्‍वनाथ मोरे हे जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांनी इर्लेवाडी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांना कळविले असता मृताच्या भावाने वैराग पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. 

यात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, 27 मे रोजी सकाळी लालासाहेब नवनाथ सरकाळे (रा. इर्लेवाडी), नवसाजी बिभीषण कदम (रा. खांडवी), खंडू कोचाळे (रा. जवळा, ता. भूम) यांनी मृत विश्‍वनाथ यांना त्यांच्या गावातून संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास इर्लेवाडी येथे सोबत घेऊन गेले होते. या तिघांनी संगनमताने विश्‍वनाथ यांचा खून केला किंवा त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मृताचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्यामुळे मृताचे शव साडेपाच वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदनासाठी सोलापूरकडे पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार असून पोलिसांनी संशयावरून एकास ताब्यात घेतले आहे.