होमपेज › Solapur › सोलापूर : सुर्ली येथे महिलेचा संशयितरित्या खून

सोलापूर : सुर्ली येथे महिलेचा संशयितरित्या खून

Published On: Jun 22 2018 6:42PM | Last Updated: Jun 22 2018 6:42PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील सुर्ली येथे एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या अंगावर मारहाण झाल्याच्या जखमा असल्याने त्यांचा खून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. द्वारकाबाई विठ्ठल चव्हाण असे मयत महिलेचे नाव आहे.  चव्हाण या गुरुवार पासून गायब होत्या.  

याबाबत अधिक माहिती अशी की,  द्वारकाबाई चव्हाण यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असुन त्यांना एक मुलगा आहे. तो पुणे येथे नोकरीस असल्याने त्या एकट्याच राहत होत्या. द्वारकाबाई चव्हाण या सुर्ली येथे गावात राहत असून गावापासून एक कि.मी.अंतरावर त्यांची शेतजमीन आहे. शेतातील उसाच्या पिकास पाणी पाजण्यासाठी द्वारकाबाई गुरुवारी ५ वाजण्याच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. त्या रात्री घरी परत आल्याच नाहीत. त्यांचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेतापासून काही अंतरावर उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या अंगावर, डोक्यात मोठी जखम होवून मोठा रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. तर, गळ्यावर व पोटावरही व्रण असल्याने त्यांचा खुन झाला असल्याची चर्चा सुरू होती.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटना स्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.  टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम अद्याप सुरू होते. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.