Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Solapur › विद्यापीठ प्रतिनिधीपदी सुप्रिया नलवडे बिनविरोध

विद्यापीठ प्रतिनिधीपदी सुप्रिया नलवडे बिनविरोध

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:33PM

बुकमार्क करा
कुर्डुवाडी : प्रतिनिधी

येथील माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.एन. भिसे महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदची उमेदवार सुप्रिया हरिदास नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर संस्थेचे चेअरमन माजी आमदार विनायकराव पाटील, प्राचार्य डॉ. आर.आर. पाटील, प्रवक्ते हर्षल बागल यांनी सुप्रिया नलवडे यांचा सन्मान करीत अभिनंदन केले. 

महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातून सी.आर. म्हणून निवडल्यानंतर एकूण पंधरा जणांपैकी केवळ सुप्रिया नलवडे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सी.आर. म्हणून रेणुका फंड,  अमोल चांदणे,  शुभांगी इंगळे,  अल्फिया शेख, दीपाली लटके, कोमल सावळे, अफताब सय्यद,   सर्जेराव लोंढे, पूजा कदम, अमृता कुंभार, प्रियांका मेहेर, तेजस्वी लुंगसे,   भाग्यश्री कातुरे, विजय पाटमस आदी मतदार उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्यामागे प्रवक्ते हर्षल बागल, खंडू लोकरे, धीरज बागल यांचा महत्त्वाचा वाटा होता.  यावेळी अतुल मते, कैलास लोंढे, शुभम ढुचाळ, चेतन पाटील, अजित राजगे, पल्लवी टोणपे, मंजुश्री गोरे, कांचन व्यवहारे, वैष्णवी पाटील, प्राजक्ता गायकवाड, विभागप्रमुख डॉ. प्रा. अजिंक्य मोरे, प्रा. दिनेश शिंदे,  प्रा. शिवाजी उबाळे, प्रा. अमर जाधव,  प्रा. राणी व्यवहारे, प्रा. सोनाली पाटील, संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश शिंदे, करमाळा विधानसभेचे अध्यक्ष तुषार हाके,  माढा तालुका उपाध्यक्ष खंडू लोकरे, माऊली नलवडे, विजय नलवडे, निलेश नलवडे, बालाजी नलवडे, केशव ढोरे, नामदेव लोकरे आदींनी सुप्रिया नलवडे यांचे अभिनंदन केले. नेहमीप्रमाणे प्रवक्ते हर्षल बागल यांनी कॉलेज निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडली.  निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. तांबिले, प्रा. रामआप्पा पंतुलवार,  प्रा. महादेव थोरात प्रा. अतुल कदम यांनी काम पाहिले.