Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Solapur › सुकन्या विवाह सहयोग योजना उपक्रमात २५ तरुणांचा संकल्प

सुकन्या विवाह सहयोग योजना उपक्रमात २५ तरुणांचा संकल्प

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:03PMकळंब : प्रतिनिधी

एक पाऊल मदतीकडे या संकल्पनेतून खेर्डा (ता. कळंब) येथील 25 तरुण एकत्रित आले आहेत. त्यांनी मित्रप्रेम युवा मंचच्या वतीने सुकन्या विवाह सहयोग योजना हा उपक्रम घेऊन गावातील कोणाच्याही मुलीचे लग्‍न असो, त्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कार्य करण्यात येणार आहे, त्यामुळे मुलीच्या वडिलांचा थोड्याफार प्रमाणातील खर्च कमी होणार आहे.

ना द्वेश, ना जात, ना राजकारण, ना फायदा, ना तोटा, ना जबरदस्ती, फक्‍त आपुलकी, या करिता हा उपक्रम आहे. खेर्डा येथे सुकन्या विवाह सहयोग योजनेचा प्रारंभ शिवजयंतीचे औचित्य साधून मित्रप्रेम युवा मंचचा उपक्रमास सुरुवात करण्यात आली.  या मंचात गावातील सर्व जातीधर्मांचे असून आतापर्यंत बावीस युवक सहभागी झाले असून दि. 21 रोजी गावातील बाबासाहेब पांडुरंग जाधव यांच्या मुलीच्या लग्‍नास दहा हजार रुपयांची मदत करून योजनेचा प्रारंभ युवा मंचने केला आहे.

गावातील प्रत्येक मुलीच्या लग्‍नास दहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेणारी सर्व सहभागी युवक शेतकर्‍यांची मुले आहेत. या मित्रप्रेम मंचात शरद जाधव, रणजित जाधव, प्रदीप जाधव, चाँदपाशा सय्यद, अंनत लिके, रवींद्र लोकरे, अनवर बेग, संजय कांबळे, अमोल लिके, नानासाहेब जाधव, ज्ञानेश्‍वर लोकरे, बापुराव जाधव, कैलास लोमटे, दीपक बनसोडे, नसीन शेख, सोमनाथ लिके, प्रमोद लोकरे, तानाजी लिके, दिलीप जाधव, इर्शाद शेख, सतीश जाधव, अभय जाधव या तरुणांचा या उपक्रमात सहभाग आहे.