Fri, Jan 18, 2019 23:26होमपेज › Solapur › मी एकदम ठणठणीत  : सुधीर मुनगंटीवार (व्हिडिओ)

मी एकदम ठणठणीत  : सुधीर मुनगंटीवार (व्हिडिओ)

Published On: Dec 20 2017 3:52PM | Last Updated: Dec 20 2017 3:52PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरयंत्रावर सूज आल्‍याने त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. आता त्यातून ते पुर्णपणे बरे झाले आहेत. पण डॉक्‍टरांनी जानेवारीच्‍या पहिल्या आठवड्यापर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

याच आजारामुळे मुनगंटीवार नागपूर हिवाळी अधिवेशनाच्‍या कामकाजात सहभागी झालेले नाहीत. दरम्‍यान, मुनगंटीवार यांच्या प्रकृतीविषयी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. या सर्व चर्चांना फाटा देत मुनंगटीवार यांनी ‘मी ठणठणीत आहे’ असा खुलासा केला.

जनतेची साथ, देवाचा आर्शिवाद यामुळेच मी या आजारातून लवकर बरा झालो, तसेच लवकरच मी जनतेची सेवा करण्यास हजर होईन असेही ते म्हणाले.