Wed, Nov 21, 2018 07:41होमपेज › Solapur › सोलापूर : शेतकरी संघटनेच्या नेत्याची उपअभियंत्याला मारहाण

शेतकरी संघटनेच्या नेत्याची उपअभियंत्याला मारहाण

Published On: Mar 09 2018 3:26PM | Last Updated: Mar 09 2018 3:26PMमाढा : वार्ताहर

सिना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी टेल एन्डला पाणी न आल्याने आंदोलन करण्यात आले होते. यानंतरही पाणी न आल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला माढ्यात या योजनेचे पाणी सोडण्यासाठी पहाणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील-घाटणेकर यांनी सिना माढाचे उपअभियंता चौधरी यांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सिना माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी टेल एन्ड असणाऱ्या माढ्याच्या ओढ्यात  सोडण्यासाठी शिवसेनेच्यावतीने २४ फेब्रुवारी रोजी माढा येथे रास्ता रोको करण्यात आले होते. यानंतर चार दिवसात पाणी सोडण्याचे अश्वासन संबंधित विभागाने दिले होते. तरीही चार दिवसात पाणी न सुटल्याने माढा तहसीलसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या संदर्भात माढा तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माढ्याच्या भांगेवस्ती येथील बंधार्‍यापर्यंत पाणी सोडण्यासाठी सिना माढाचे उपअभियंता चौधरी चार कर्मचार्‍यांसह गेले होते. दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी घाटणे येथे या योजनेचे पाणी चाळीस दिवस सुरु असूनदेखील पोहचले नाही. यासंदर्भात जाब विचारला. अधिकार्‍याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी अधिकार्‍यांना मारहाण केली.