Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Solapur › विद्यार्थ्यांनी व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी रासेयोमध्ये सहभागी व्हावे : शोभा खेडगी

विद्यार्थ्यांनी व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी रासेयोमध्ये सहभागी व्हावे : शोभा खेडगी

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 9:24PM

बुकमार्क करा
अक्कलकोट : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्तव विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी केले.  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय  सेवा योजनेच्यावतीने आपत्ती निवारण व व्यवस्थापनासाठी युवक या उद्देशाने बॅगेहळ्ळी ( ता. अक्कलकोट ) येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा शोभा खेडगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच महादेव किणगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी गायकवाड, प्रभारी प्राचार्य डॉ. एस.सी. अडवितोटे, उपप्राचार्य दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षक बसवराज चडचण, कार्यक्रमाधिकारी डॉ. सी. डी. कांबळे, डॉ. एस. डी. काळे, प्रा. शिवाजी धडके, प्रा. संध्या परांजपे, प्रा. संध्या इंगळे, ग्रामसेवक भडकुंबे उपस्थित होते. 

नगराध्यक्षा शोभा खेडगी पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन मानले गेले आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे विविध सामाजिक गटांना एका राष्ट्रीय घटकात आणि प्रवाहात सामील करून घेण्याची प्रक्रिया आहे. दत्तक गावात कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी हे राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून सांगतात व क्रियात्मक रूप देतात. व्यक्तिमत्त्व विकास योजनेचे ध्येय आहे. शिक्षित जनशक्तीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून उत्तम राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याची प्रक्रिया म्हणजे रासेयो होय. व्यक्तिमत्त्वाच्या निरनिराळ्या व्याख्या करण्यात आल्या आहेत. राजस आणि तामस असे दोन प्रकारचे व्यक्तिमत्त्व मानतात. 

डॉ. अडवितोटे म्हणाले, अध्ययनामुळे निर्माण होणार्‍या अर्जित प्रवृत्ती म्हणजे गुणविशेष. लहानपणापासून व्यक्तीला जे विविध अनुभव येतात त्यातून हळूहळू गुणविशेष निर्माण होतात. रा. से. योजना तर अनुभवांचे भांडारच आहे. याप्रसंगी  प्रा. संध्या इंगळे, ग्रामसेविका  भडकुंबे, तानाजी मोरे, गुणवंत शिरसाड, प्रा. काकासाहेब तोडकरी, प्रा. विजया कोन्हाळी, डॉ. लता हिंडोळे व विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.