Sat, Feb 23, 2019 04:05होमपेज › Solapur › पिलीव येथे आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचा रास्ता रोको 

पिलीव येथे आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचा रास्ता रोको 

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:51PMपिलीव :  वार्ताहर

महाराष्ट्रातील धनगर समाजाला  एस.टी (अनु.जमाती) चे आरक्षण मिळावे म्हणून पिलीव येथे सातारा- पंढरपूर रस्त्यावर गजीढोल व वीरगजीढोल खेळवून रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी पांडुरंग वाघमोडे,  रावसाहेब देवकाते प्रा. संतोषकुमार शेंडगे, शाम मदने, नारायण सुळे, शिवराज पुकळे, तसेच बचेरी, सुळेवाडीचे गजीढोल संघ सहभागी झाले होते.
यावेळी माजी आ. प्रकाश शेंडगे  म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धनगर समाजाला एस.टी. चे आरक्षण देण्याचा शब्द पंढरपूर येथील समाज  मेळाव्यात दिला होता. तो शब्द खरा करण्यासाठी धनगर समाजाला केंद्र व राज्य सरकारने आरक्षण द्यावे हिच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार येताच आरक्षण देऊ असा शब्द बारामतीच्या मेळाव्यात दिला होता. पण तो शब्द न पाळल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली .

 यावेळी ऋषिकेश मदने, मनसेचे सुरेश टेळे,प्रा.संजय हुलगे यानी विचार व्यक्त केले.  सुमारे तीन तास रास्ता रोको करण्यात आला. मागणीचे निवेदन पिलीवचे मं़डल आधिकारी संदीप चव्हाण यांनी स्वीकारले.  तर पोलिस निरीक्षक विश्‍वभंर गोल्डे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन तुषार वगरे, आभार प्रदर्शन प्रा.जयवंत बगाडे यांनी मानले.