Fri, Apr 26, 2019 15:29होमपेज › Solapur › सहाय्यक भंडारपाल लाचलुचपतच्या जाळ्यात

सहाय्यक भंडारपाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:28PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी 

येथील भीमा विकास उपविभागातील लिपीकाने भाड्याने लावलेल्या जीपचे बील तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यासाठी येथील लिपीकाकडे 1600 रुपयांचे लाच मागितली. सदर लाच स्वीकारताना सहाय्यक भंडारपाल लिपीक आलेकर हे तक्रारदार यांचेकडून लाच स्वीकरताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना दि. 4 रोजी दुपारी 12.50 वा .घडली आहे. संगाप्पा शंकर ओलेकर(वय 30) असे लाच स्वीकारणार्‍याचे लाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदर तक्रारदार यांनी भीमा उपविभाग क्र.4 येथे उपविभागाची वसुली करण्यासाठी जीप क्र. एम.एच. 45- ए. 7535 भाड्याने लावली होती. सदर जीपचे भाड्याचे बील करून ते लिपीक ओलेकर यांच्या कार्यालयास मंजुरीसाठी पाठविले होते. हे बील मंजूर करून ती रक्‍कम अदा करण्यासाठी लिपीक संगाप्पा शंकर ओलेकर हे तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करीत होते. 

याबाबत तक्रारदार याने दि. 15 नोव्हे. रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत लाचलुचपत विभागाने खात्री करून दि. 4 रोजी दुपारी 12.50 वा. 1600 रुपयांची रक्कम स्वीकारताना भीमा पाटबंधारे विभाग कार्यालयमध्ये रंगेहाथ पकडले. शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभागाचे अरुण देवकर यांनी केली.