Mon, Apr 22, 2019 12:11होमपेज › Solapur › पंढरपुरात ठिय्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद(Video)

पंढरपूर: आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद(Video)

Published On: Aug 05 2018 1:23PM | Last Updated: Aug 05 2018 1:39PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज आंदोलनास प्रचंड गर्दी उसळली आहे. दरम्यान, सकाळी पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान सुमारे दीड किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रोपळे जिल्‍हा परिषद गटातील सर्व गावातील हजारो युवक आणि नागरिक घोषणाबाजी करीत आले आहेत. तहसील कार्यालयासमोर उभारलेला भला मोठा शामियाना आंदोलकांना बसण्यासाठी अपुरा पडत असून रस्त्यावर तळपत्या उन्हात शेकडो आंदोलक बसले आहेत. 

आंदोलन सुरू होऊन ३ दिवस झाले तरी अद्याप शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. तसेच आंदोलन अधिक व्यापक आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.