Wed, Nov 21, 2018 01:04होमपेज › Solapur › डीबीटी योजनेने सेस फंडातील खर्चाचा टक्‍का घसरला!

डीबीटी योजनेने सेस फंडातील खर्चाचा टक्‍का घसरला!

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:53PMसोलापूर : महेश पांढरे

शासनाच्या काही योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन खात्यावर पैसे जमा करण्याचे धोरण ठेवून डीबीटी योजना राबविली असून या योजनेमुळे निधी खर्चात जिल्हा परिषद मागे पडत असून या योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे जि.प. सेस फंडातील खर्चाचा टक्‍का घसरला आहे.

जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आता ऑनलाईन पद्धत राबविली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून अनेक विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जात होती; मात्र थेट खात्यात पैसे जमा होणार असल्याने अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांला सुरुवातीला स्वत:चे पैसे गुंतवावे लागणार असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण व कृषी विभागाच्याही अनेक योजनांना प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे सन 2017-18 या आर्थिक वर्षातील खर्च केवळ 20 टक्केच झाला असल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. 

काही योजनांचे पैसे जमा करण्याचे काम चालू आहे, तर अनेक योजनांच्या लाभार्थीचे बँक खाती नंबर चुकल्याने हा निधी अखर्चित दिसत असला तरी लवकरच हा निधी खर्च होईल, अशी अपेक्षा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली आहे.