Sun, Jul 21, 2019 12:50होमपेज › Solapur › विकासकामांचा निधी वेळेत खर्ची टाका : ना. पाटील

विकासकामांचा निधी वेळेत खर्ची टाका : ना. पाटील

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 11:09PMसोलापूर :  प्रतिनिधी

नगरपालिका आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान, स्वच्छता, विकासकामासाठी दिलेला निधी विहीत वेळेत खर्च करणे आदी बाबींना प्राधान्य द्यावे, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी येथे दिल्या.

पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची सोलापूर महापालिकेत गुरूवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ना.  पाटील यांनी वरील सूचना दिल्या. 

यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील आदी उपस्थित होते. नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण करा, असेही यावेळी ना. पाटील यांनी सांगितले. 
बैठकीस पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित होते. पाच जिल्ह्यांतील नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेण्यासाठी मोठ्या हॉलची गरज होती. याकरिता महापालिकेच्या सभागृहाची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. या मागणीस मनपाने होकार देत सभागृह उपलब्ध करुन दिले. गुुरुवारी महापालिका सभागृह व परिसर गर्दीने फुलून गेला होता.