Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Solapur › बाळा नांदगावकरांसमोर मनसैनिकांमध्ये राडा

बाळा नांदगावकरांसमोर मनसैनिकांमध्ये राडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 सोलापूर : प्रतिनिधी 

हापालिका निवडणुकीमध्ये तत्कालीन पक्षनिरीक्षक बाबाराजे जाधवर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासमोरच  कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, तसेच शिवीगाळीचा प्रकारही घडला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभराचा आढावा पक्षाच्या वतीने घेण्यात येत असून त्यासाठी खास टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाळा नांदगावकर हे गुरुवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी पक्ष संघटनेचा आढावा घेत असताना महापालिका निवडणुकीत पक्षनिरीक्षक बाबाराजे जाधवर यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत त्यांच्याविषयी अनिल व्यास यांनी अपशब्द वापरल्याने प्रशांत इंगळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे दोन्ही बाजूने गोंधळ सुरू झाला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनाही काही काळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. झालेला प्रकार खरा असून तो आमच्या पक्षांतर्गत भाग असल्याचे सांगत झालेल्या घटनेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न नांदगावकर यांनी केला. आगामीकाळात पक्ष संघटना वाढविण्यासाठी मनसे सर्वसमान्य शेतकरी व कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी पक्षाची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली. यावेळी दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर, उमेश रसाळकर, युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, अनिल व्यास, सुप्रिया महिंद्रकर आदी उपस्थित होते.

Tags : Solapur, Solapur News, Special team, formed, backdrop, Lok Sabha,  Vidhan Sabha, elections


  •