Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Solapur › जुने मेडिकल कॉलेजचे आवार आठवणींनी गहिवरले

जुने मेडिकल कॉलेजचे आवार आठवणींनी गहिवरले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जुन्या मेडिकल कॉलेजमध्ये 1963 पासूनचे साडी आणि बेलबॉटममध्ये शिकलेले विद्यार्थी आज तज्ज्ञ, नामवंत डॉक्टर म्हणून देश-विदेशांत कार्यरत आहेत. परंतु मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना उतरत्या वयात पुन्हा विद्यार्थी म्हणून हजर व्हावे लागले आणि जुन्या मेडिकल कॉलेजचे आवार पुन्हा आठवणींनी गहिवरल्याचे दिसून आले. निमित्त होते मेडिकल कॉलेजच्या 1963 ते 2018 मधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.

मेडिकल कॉलेजला 55, तर सिव्हिल हॉस्पिटलला 105 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मेडिकल कॉलेजमधील माजी विद्यार्थी संघटना, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मार्च आणि 1 एप्रिल 2018 रोजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन जुने वैद्यकीय  महाविद्यालयाच्या प्रांगणात केले होते.  

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक, माजी डिन यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. घाटे म्हणाले, व्हीएमजीएमसी माजी विद्यार्थी संघटना गेल्याच वर्षी स्थापन झाली आहे. त्यांच्या पुढाकारातून मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सेवासुविधांसाठी प्रयत्न होत आहेत. येथे आलेल्या इतर माजी विद्यार्थ्यांनी या वास्तूतील आपलेपणा, स्पंदने जागवावीत, जुन्या आठवणींना उजाळा द्या, आपल्या वैयक्तिक आयुष्यात, व्यवसायात खूप प्रगती करा, मात्र कॉलेजची असलेले नाते, नाळ जोडून ठेवा. सहकार्य, मदत करा,  लेक्‍चर द्या.  यावेळी माजी डिन, माजी प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. ‘सुवर्णपर्व 1963-2018’ या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. यावेळी जुन्या मेडिकल कॉलेजची स्थापना ते आजपर्यंतचा प्रवास असलेली चलचित्रफित दाखवण्यात आली. ज्याची संकल्पना  आणि शोध डॉ. पी. ए. गाडगीळ, दिग्दर्शक पवन बारगजे, पटकथा डॉ. रूद्रेश, ध्वनी अनिरूध्द जोशी आणि निर्माता व्हीएमजीएमसी माजी विद्यार्थी संघटना होती.

Tags : Solapur, Solapur  News, Sounds, old medical colleges, overwhelmed, memories


  •