Sat, Nov 17, 2018 13:10होमपेज › Solapur › सोलापूर : तरुण अडकले मलेशियातील तुरूंगात

सोलापूर : तरुण अडकले मलेशियातील तुरूंगात

Published On: Dec 06 2017 7:24AM | Last Updated: Dec 06 2017 2:04PM

बुकमार्क करा

मंगळवेढा : प्रतिनिधी

येथील तरुण बनावट व्हिसा आणि पासपोर्ट नसल्याने मलेशियातील तुरूंगात आहे. नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाकडून रक्कम घेवून एजंट फरार झाला आहे.  दीपक लिम्बाजी माने रा.मानेवाडी असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दीपक मानेचे आई वडील उसतोडीसाठी गावातून बाहेर असतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने बाहेर देशात काम करण्याचा मार्ग निवडला आहे.  कराड येथील साईप्रसाद इंस्टिट्यूट अॅन्ड बिझनेस मॅनेजमेंट या संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स त्याने केला होता. त्यानंतर सांगली येथील एका  एजंटच्या माध्यमातून त्याने मलेशियातील नोकरीसाठी प्रयत्न केले. नोकरीसाठी एजंटने दिड लाख रुपयांची रक्कमदेखील त्याच्याकडून घेतली. सध्या एजंट फरार असून त्याचा शोध सुरु आहे. मलेशियात अडकलेल्या त्या तरुणाचा पासपोर्ट या एजेंटच्या ताब्यात असल्याने अडचण वाढली आहे.

यामध्ये अक्कलकोट, कर्जत, जळगाव, कराड येथील तरुणांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे असलेला ट्रॅव्हल व्हिसा संपला असुन वर्किंग व्हिसा बनावट असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पासपोर्ट जवळ नसल्याने अडकलेल्या तरुणांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. याबाबतची कोणतीही कल्पना तरुणांच्या पालकांना नसल्याने याप्रकरणाची अजुन तरी पोलिसांत नोंद झालेली नाही.

दरम्यान फसवणूक करणारा एजंट कराडचा तर सूत्रधार सांगलीचा असल्याची चर्चा आहे.