Mon, Aug 19, 2019 00:49होमपेज › Solapur › गुंठेवारी बांधकामे नियमित करून घ्या : ना. देशमुख

गुंठेवारी बांधकामे नियमित करून घ्या : ना. देशमुख

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 8:40PM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेल्या रेखांकनातील अनधिकृत बांधकामे 31 डिसेंबर 2018 पूर्वी नियमित करून घेण्याबाबतचे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. या निर्णयामुळे गुंठेवारीचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.  26 डिसेंबर रोजी सोलापूर येथील कार्यालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. महानगरपालिका अंतर्गत हद्दवाढ भागात किमान 50 हजार घरांचा प्रश्‍न सन 2000 पासून प्रलंबित आहे. नागरिकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  

  यावर आयुक्तांकडून अहवाल सादर झाल्यानंतर गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेल्या रेखांकनातील अनधिकृत बांधकामे  31 डिसेंबर 2018 पूर्वी नियमित करून घेण्याबाबतचा निर्णय सोलापूर येथील बैठकीत घेण्यात आला  आणि ही बांधकाम परवानगी नियमितीकरणासाठी अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, भूखंडाच्या मालकीच्या किंवा कायदेशीर कब्जाबाबतचा पुरावा - सात-बारा / मिळकतपत्रिका / नोंदणीकृत खरेदी दस्तऐवज / इंडेक्स -टू / अनोंदणीकृत दस्त / नोटरी, बांधकाम / भूखंड 1 जानेवारी 2001 पूर्वीचा असल्याबाबतचा निर्विवाद पुरावा -  31.12.2001 पूर्वीचे म. न. पा. / ग्रामपंचायत टॅक्स भरलेली पावती / वीज बिल, / टेलिफोन बिल / रेशनकार्ड, तहसीलदार यांच्याकडून अनधिकृत बिनशेती वापर दंडाची कारवाई झालू असल्यास त्याबाबत पुरावा.

(दंडाची रक्कम भरल्याची पावती / चलन / आदेश ), गृहनिर्माण संस्थेतील भूखंड असल्यास संस्थेचे ना-हरकत पत्र व प्लॉट अलॉटमेंट पत्र, सोसायटी / फेडरेशन स्थापन असल्यास याचे ना-हरकत पत्र व अलॉटमेंट पत्र, विनापरवाना किंवा विद्यमान रेखांकनाचा आराखडा - वास्तू विशारद यांनी तयार केलेला व साक्षांकित केलेला विद्यमान रेखांकन / बांधकाम / दुरुस्तीचा आराखडा, शक्य असल्यास तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील मोजणी नकाशा, विहीत केलेले हमीपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी. या प्रक्रियासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.