Tue, Jan 22, 2019 07:30होमपेज › Solapur › सोलापुरात छोटा हत्ती चोरणार्‍यास अटक; माल जप्त

सोलापुरात छोटा हत्ती चोरणार्‍यास अटक; माल जप्त

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 8:41PMसोलापूर : प्रतिनिधी

 छोटा हत्ती चोरणार्‍या संशयित चोरट्यास अटक करण्यात सदर बझार पोलिसांना यश आले असून त्याकडून सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. रविराज काशीनाथ मोरे (वय 35, रा. यशनगर, सोलापूर) व पांडुरंग उत्तम टोणपे (वय 40, रा. शाहिर वस्ती, सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 13 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील काडादी चाळ जवळ उभे असलेल्या छोटा हत्ती(एम.एच. 13 एएक्स 8475) व त्यामधील 5 प्रिंटर असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

सदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वपोनि अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज मोरे व पांडुरंग टोणपे यांना अटक करुन अधिक चौकशी केेली असता गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी तात्काळ छोटा हत्ती व प्रिंटर हस्तगत केले. ही कामगिरी पोनि अंकुशकर, पोनि आय. सय्यद, सपोनि पवळ, पोह उध्दव घोडके, पोना दीपक डोके, पोकॉ कुंभार यांनी केली.