होमपेज › Solapur › पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती

पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 8:47PM

बुकमार्क करा

सोलापूर ः प्रतिनिधी

 पित्याचे छत्र हरपलेल्या, आर्थिक परिस्थिती नसलेल्या एका गरीब मुलीच्या शिक्षणासाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम वीरशैव व्हिजनच्यावतीने घेण्यात आला. सोलापुरातील समाजसेवक पियुष शहा यांनी यासाठी बारा हजार रुपयांचे दातृत्व विद्यार्थिनीस दिल्याने या मुलीचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  पित्याचे निधन झाल्याने कुटुंबावर  संकट कोसळलेलं, आई घर चालवण्याइतपत आर्थिक उत्पन्न मिळवते,  शिक्षणाचा खर्च कसा करणार, अशा बिकट परिस्थितीत नाउमेद न होता शिवानी शिकत राहिली. अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. गुणवत्तेच्या जोरावर तिला नामांकित अशा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला.  मात्र मोठ्या रकमेच्या फीचे नवे संकट तिच्यासमोर उभे राहिले. सिंडीकेट बँकेचे शैक्षणिक कर्ज घेऊन तिने ते संकट सोडवले. फी भरली, कॉलेज सुरू झाले.

वर्षभर लागणार्‍या शैक्षणिक साहित्यासाठी पैशाची चणचण भासू लागली. मग तिने वीरशैव व्हिजनशी संपर्क साधला. व्हिजनने सामाजिक कार्यकर्ते पियुष शहा यांच्यासमोर शिवानीची व्यथा मांडली. त्यांनी लागलीच मदत करण्याची तयारी दर्शविली. पियुष शहा यांच्या हस्ते, सिद्धेेश्‍वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक शशिकांत (कांतू) पाटील, राजशेखर शेट्टी , भालचंद्र पाटील, जनता बँकेचे संचालक महेश अंदेली, व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात शिवानी धबडे हिला रोख 12000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

यावेळी प्राचार्य धरणे यांची सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कांतू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून बुरकुले यांनी व्हिजनच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचलन अमृता नकाते हिने, तर आभार प्रदर्शन विजय बिराजदार यांनी केले. याप्रसंगी सुनील शरणार्थी,  सिध्दाराम कोनापुरे, राजू तुगावकर, आनंद दुलंगे, चिदानंद मुस्तारे, शिवानंद सावळगी, महेश विभुते, संजय साखरे, Aअरुण पाटील, आप्पासाहेब पसारगे, मेघराज स्वामी, सिद्धू बिराजदार, अमित कलशेट्टी आदी उपस्थित होते.