होमपेज › Solapur › लातूरमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना; ५०० कोटींचा प्रकल्प

लातूरमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना; ५०० कोटींचा प्रकल्प

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:19PMसोलापूर : प्रतिनिधी

भारतीय रेल्वे महाराष्ट्रातील लातूर शहरात येथे  कोच फॅक्टरी स्थापन करणार असल्याची माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क विभागातर्फे अधिकृतरित्या कळविण्यात आली. प्रकल्पामुळे हजारो लोकांना प्रत्यक्ष रोजगार, तर अप्रत्यक्ष रूपात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे वर्तवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात पूरक उद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. 

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाप्रसंगी  केंद्रीय रेल्वे आणि कोळसामंत्री  पियूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये  रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्यावतीने अनुक्रमे रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य  बी. के. अग्रवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय सेठी यांनी लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी स्थापनेसाठी बुधवारी मुंबईत सामंजस्य करारावर हस्ताक्षर केलेे.    

 रेल्वे आणि कोळसामंत्री पियूष गोयल याप्रसंगी म्हणाले की, पहिल्या टप्प्यासाठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक असली तरी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार आणखी मोठी कल्पना स्पष्ट करण्याचा दृष्टिकोन आहे.  ते पुढे म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे  योगदान  उल्लेखनीय आहे. मग ते कराच्या रुपात असो व विविध क्षेत्रांतील प्रगतीच्या रुपात असो. या प्रकल्पाचे काम जलदगतीने  आणि उच्च प्राथमिकतेच्या आधारावर मंजुरी प्रदान करण्यात येईल.  

सुमारे 150 हेक्टर क्षेत्रफळाच्या  जमिनीवर पहिल्या टप्प्यात अंदाजे  500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल.   या प्रकल्पासाठी राज्य शासन सवलतीच्या दराने  जमीन उपलब्ध करून दिली जाईल. आवश्यक जमिनीसह रेल्वे संपर्काची सुविधा दिली जाईल. पाणी, वीज आणि राज्य जीएसटी इ. स्थानीय करांवर सवलत दिली जाईल. सडकमार्गे संपर्काची सुविधा देण्यात येईल. सर्व वैधानिक परवानग्या त्वरित मंजुरी प्रदान करण्यात येईल.