Sat, Apr 20, 2019 18:26होमपेज › Solapur › पेपर फुटीप्रकरणी शिक्षणाधिकारी सोनवणे यांना निलंबित करा : पाटील

पेपर फुटीप्रकरणी शिक्षणाधिकारी सोनवणे यांना निलंबित करा : पाटील

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:16PMसोलापूर : प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रात परीक्षा सुरु असतानाच बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने याप्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जि.प. सदस्य उमेश पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. 

सत्यवान सोनवणे यांचा कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. पेपरफुटीचा प्रकार घडू नये यासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक तंत्र वापरुन दक्षता बाळगली होती. सोनवणे यांनी परीक्षा काळात नियंत्रण ठेवण्यात पुरेशी यंत्रणा न ठेवल्याने खबरदारी न घेतल्याने असा प्रकार घडला आहे. त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळेच पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. शिक्षक समायोजन प्रक्रियेतही त्यांच्यावर चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. सोनवणे यांचा संपूर्ण कारभारच वादग्रस्त असल्याने त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

याप्रकरणी सोनवणे यांच्यावर कारवाई न झाल्यास जि.प. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत सोनवणे यांच्याविरोधात तीव्र कारवाईची भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.