Mon, Jun 24, 2019 17:22होमपेज › Solapur › असंघटित कामगारांसाठी नवीन कायदा करणार: मुख्यमंत्री

असंघटित कामगारांसाठी नवीन कायदा करणार: मुख्यमंत्री

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 8:48PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना आर्थिक विकासाचे व सर्व हक्क प्राप्त होणारे कायदे करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना राज्य शासनाने कामगार कायद्यात समाविष्ट करुन घ्यावा, कर्जमाफी करावी आणि केंद्र शासनाचे असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करावे आदी मागण्यांचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगारांची कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कामगार बचाव संघर्ष यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निलम गोर्‍हे व विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे संपूर्ण यात्रेचा अहवाल व मागण्यांचे निवेदन देऊन कामगार बचाव संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात आला. निवेदन व अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री यांनी शेतमजूर व असंंघटित कष्टकरी कामगारांसाठी आर्थिक विकासाचे नवीन कामगार कायदा आणणार, असे आश्‍वासन दिले.

या शिष्टमंडळात विष्णू कारमपुरी, विठ्ठल कुर्‍हाडकर, शिवा ढोकळे, श्रीनिवास बोगा, प्रभू रामचंद्र गदगे, प्रशांत जक्का, कुमार पेंटा यांचा समावेश होता. संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या कामगार बचाव संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी दशरथ नंदाल, पप्पू शेख, मुमताज सय्यद, लक्ष्मीबाई ईप्पा, कमलाबाई गुंडेटी, मिराबाई लच्छुवाले, रमाबाई पंदिला, पार्वतीबाई पंदिला, वंदना आडम, रेखा आडक, हरी दुध्याल, विणा गणेश, रामेश्‍वरी म्हंता, अश्‍विनी चिकणी, अनिता बटगिरी, विद्या जगताप आदींनी परिश्रम घेतले.