Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Solapur › घरकुल योजनेत सोलापूर राज्यात पहिल्या क्रमांकावर

घरकुल योजनेत सोलापूर राज्यात पहिल्या क्रमांकावर

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 9:09PMसोलापूर ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत  शासनाने दिलेले उदिष्ट पुर्ण करुन सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकाविल्याने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेचे कौतुक करण्यात आले आहे. जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी या योजनेत उल्‍लेखनीय यश प्राप्‍त केले आहे. मागील तीन वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेला 15 हजार 778 घरकुलाचे उदिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. यापैकी 10 हजार 73 घरकुलाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.या यशाबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेचे अभिनंदन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत तीन वर्षाकरीता 8 हजार 891 घरकुलाचे उदिष्ट देण्यात आले होते. यापैकी 2 हजार 981 घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. शबरी आवास योजनेअंतर्गत तीन वषांत 512 घरकुलाचे उदिष्ट देण्यात आले होते. यापैकी 448 घरकुलाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. पारधी आवास योजनेअंतर्गत 159 घरकुलाचे उदिष्ट देण्यात आले होते. यापैकी 112 घरकुलाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. या योजनेत सोलापूर राज्यात पहिल्या क्रमांकावर ठरला आहे. उर्वरीत अपुर्ण घरकुलाचे कामही पुर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे. चालू वर्षात मंजूर असलेल्या घरकुलाचे काम ही वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेनेकडून नियोजन करण्यात येत असून यासाठी सातत्याने जिल्हा परिषदेत व पंचायत समिती स्तरावर बैठका आयोजीत करण्यात येत आहेत.