Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Solapur › फर्स्ट क्‍लास तिकिटांमधून  5% जीएसटी

फर्स्ट क्‍लास तिकिटांमधून  5% जीएसटी

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 9:08PMसोलापूर :  प्रतिनिधी

रेल्वेच्या फर्स्ट क्‍लास किंवा वातानुकुलित तिकिटांमधून अप्रत्यक्षपणे जीएसटीची वसुली केली जात आहे. त्यामध्ये 2.5 टक्के सीजीएसटी व 2.5 एसजीएसटीचा भरणा प्रवाशी करत आहेत. 1 जुलै 2017 पासून भारतात ‘एक देश एक कर’ ही संकल्पना राबविण्यात आली. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के व 28 टक्के अशी त्याची रचना करण्यात आली आहे. रेल्वेमधून वातानुकुलित किंवा फर्स्ट क्‍लास ए.सी.मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना 5 टक्के जीएसटी भरणा करावा लागत आहेत.

राजधानी शताब्दी व दुरांतो या गाड्या पूर्णत: वातानुकूलित आहेत. तसेच या गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासन जेवणाची देखील व्यवस्था केली आहे. शताब्दी, दुरांतो किंवा राजधानी गाड्यांचे तिकिटाचे आरक्षण देताना रेल्वेकडून केटरींग दर आकारले जाते. त्यासोबत जीएसटीची देखील वसुली केली जात आहे. मेल, एक्स्प्रेसचे वातानुकूलित किंवा फर्स्ट क्‍लास ए.सी. तिकीट काढल्यास सीजीएसटी व एसजीएसटी  5 टक्के भरणा करावा लागत आहे.