Sun, May 26, 2019 20:37होमपेज › Solapur › सोलापूर : वैरागमधील व्‍यापार्‍यास ८३ लाखाचा चुना

सोलापूर : वैरागमधील व्‍यापार्‍यास ८३ लाखाचा चुना

Published On: Mar 10 2018 5:00PM | Last Updated: Mar 10 2018 5:00PMवैराग : प्रतिनिधी

येथील प्रसिध्द आडत व्यापऱ्यास बनावट फार्म दाखवून सुमारे ८३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आडत व्यापारी शशिकांत महाबळेश्वर गावसाने यांनी वैराग पोलिसात फिर्यादी दिली आहे.

येथील प्रसिद्ध आडत व्यापारी शशिकांत गावसाने यांच्याकडे के. रमेश याने माझ्या भार्गवी ट्रेडिंग कंपनी चेन्नई, लक्ष्मी नारायण ट्रेडर्स चेन्नई जी. एन. राघवेंद्रा बेंगळूरू अशा तीन कंपन्या आहेत. आपल्याला तूर आणि हरभरा माल मला देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार त्यांना दिलेल्या मालाची ८३ लाख ४ हजार ९३६ रुपये दिलेले नाहीत. यामधील प्रसिद्ध आडत व्यापारी शशिकांत गावसाने, शिरीष गावसाने व शीतल गावसाने हे हरभरा, तूर, चना डाळ यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना के. रमेश या इसमाने फोनवरून त्यासाठी तूर हरभरा याची मागणी केली. मागणीप्रमाणे त्यांनी के. रमेश याने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायणट्रेडर्स चेन्नई यांना १०४ टन ३५० किलो तूर व ५०६ टन ६०० किलो हरभरा पाठविला होता. मात्र के रमेश यांनी सदरचा माल चेन्नई येथे उतरवून न घेता अनंतपूर येथे उतरवून घेतला. त्यानंतर जी. एन. ट्रेंडिंग कंपनीला १५  एप्रिल २०१७ ते २५ एप्रिल २०१७ दरम्यान ६३ टन चना डाळ गावसाने यांनी पाठविली मात्र सदरचा पाठविलेला माल बंगरुळू येथे उतरवून न घेता के रमेश याने व्होसपेट येथील सरदाराची ढाबा येथे उतरवून घेतला. गावसाने यांनी पाठविलेल्या संपूर्ण मालाची किंमत ४ कोटी ९९ लाख २ हजार ५३६ रुपये इतकी होते. या रक्‍कमपैकी के. रमेश याने राघवेंद्र कंपनीच्या खात्यातून ४कोटी १५ लाख ९७ हजार ६०० रुपये, आरटीजीएसव्दारे गावसाने याना दिले. त्यानंतर राहिलेल्या ८३ लाख ४ हजार ९३६ रुपया संदर्भात गावसाने यांनी वारंवार मागणी केली असता के. रमेश याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

गावसाने यांनी अधिक चौकशी केली असता के. रमेश याने सांगितलेल्या तिन्ही कंपन्या अस्तित्वात नसल्याचे निर्दशनास आले असून के. रमेश याने ८३ लाख ४ हजार ९३६ रुपयाचा गंडा घातल्याचे स्‍पष्ट झाले आहे. शशिकांत महाबळेश्वर गावसाने यांनी वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याघटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर करीत आहेत.