Fri, Jan 18, 2019 11:27होमपेज › Solapur › अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या

अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:45PM

बुकमार्क करा
सोलापूर :  प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या टीमने अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या. बसण्णा सत्तू शिंदे (वय 25, रा. न्यू शिवाजीनगर, गोंधळे वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले. 75 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शनिवारी श्री सिद्धेेश्‍वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी अक्षता सोहळा असल्याने गुन्हे शाखेच्या सर्व पोलिस अधिकार्‍यांना सिद्धेेश्‍वर यात्रेत गस्त घालत होते.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस  निरीक्षक रणजित माने यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली बसण्णा शिंदे हा चोरटा गोंधळे वस्ती येथे थांबला आहे. त्याकडे चोरीची दुचाकी आहे. मागील वीस दिवसांत त्याने विडी घरकूल परिसरात चोर्‍या केल्या आहेत.  गुन्हे शाखेच्या टीमने गोंधळे वस्ती  येथे जाऊन बसण्णा शिंदे यास ताब्यात घेऊन सोबत असलेल्या वाहनाची विचारपूस केली. त्याला सांगता आले नाही. शेवटी त्याने कबुली देत त्याचा साथीदार संतोष अजय कांबळे (रा. जय मल्हार चौक, आडवा नळ) याच्यासोबत सुमारे  वीस दिवसांपूर्वी जोडबसवण्णा चौकातील एका हॉटेलसमोरून ती 
चोरी केली  असल्याचे कबूल केले.

तसेच साथीदारांसह गेल्या वीस दिवसात वालचंद कॉलेज, हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरात घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिस ठाण्यातील नोंदी पाहिल्या असता जेलरोड पोलिस स्टेशन, एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे  शाखेने जेलरोड व एमआयडीसी पोलिस ठाण्यातील नोंदीनुसार 75 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईमध्ये  पोहेकॉ. नंदराम गायकवाड, जयंत चवरे, पो.ना. दीपक राऊत, विनायक बर्डे, सागर सरतापे, सचिन होटकर, सुहास अर्जुन, विजय निंबाळकर सहभाग घेतला.