होमपेज › Solapur › संजय तेली नवे निवासी उपजिल्हाधिकारी 

संजय तेली नवे निवासी उपजिल्हाधिकारी 

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:24PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

शासनाने  उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, संजय तेली यांची निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर जिल्ह्याला नव्याने चार उपजिल्हाधिकारी मिळाले असून दोन उपजिल्हाधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांची पदोन्नतीने बदली झाली होती. त्यामुळे अनेक दिवस निवासी उपजिल्हाधिकारीपद रिक्त होते. या रिक्त जागेवर विठ्ठल मंदिर समिती पंढरपूरचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दोन उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये पंढरपूरचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांची कडेगाव, जिल्हा सातारा येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे, तर भूसंपादन क्रमांक 1 च्या उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार यांचा समावेश आहे, तर बदलीने रिक्त होणार्‍या पंढरपूर प्रांताधिकारीपदी  महावितरणचे कार्यकारी संचालक सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूसंपादन क्रमांक 7 चे उपजिल्हाधिकारीपद गेले अनेक दिवस रिक् होते.

याजागी कडेगाव, जिल्हा सांगलीचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांची, तर भूसंपादन क्रमांक 3 या रिक्तपदावर  तार्‍याचे निवासी उपजिल्हाधिाकरी भारत वाघमारे यांची, तर माळशिरस प्रांताधिकारी या रिक्त पदावर शमा ढोक-पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  भूसंपादन क्रमांक 6 च्या उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार यांची आठ महिन्यांपूर्वीच सोलापुरात बदली करण्यात आली होती. मात्र त्या सोलापुरात रुजूच झाल्या नाहीत. त्यांची शासनाने पुन्हा भूसंपादन क्रमांक 22 पुणे येथील उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे, तर त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.