Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Solapur › सहशिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

सहशिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:11PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहशिक्षक शुभूलिंग गुरप्पा वाले (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्या शाळेच्या महिला प्राचार्यांनी फिर्याद दाखल केली आहे.एमआयडीसी परिसरातील  आदर्शनगरमधील एका शाळेत   शुभूलिंग वाले हा सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. वाले याने त्याच शाळेत 10 वी मध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीला  गेल्या अनेक दिवसांपासून शाळेतील वरच्या मजल्यावर रिकाम्या क्‍लासरुममध्ये बोलावून मोबाईलमधील घाणेरडे अश्‍लिल व्हिडिओ दाखवून त्या विद्यार्थिनीशी अश्‍लिल कृत्य करून तिचा विनयभंग केला म्हणून त्या पीडित विद्यार्थिनीने याबाबत शाळेच्या प्राचार्यांना व तिच्या घरच्यांकडे तक्रार केली. त्यामुळे प्राचार्यांनी वाले यास याबाबत खुलासा विचारला होता. त्यामुळे अखेर प्राचार्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

पादचारी महिलेच्या गळ्यातील 60 हजाराचे गंठण लंपास

विजापूर रोडवरील समर्थ सोसायटीमधील बैठक संपवून पायी घराकडे जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेले. 

याबाबत  राजश्री   अशोक काजगार (वय 48, रा. कित्तूर चन्नम्मानगर, सैफुल)  या  महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा प्रकार रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कित्तूर चन्नम्मानगर येथील टेलिफोन खांबाजवळ   रोडवर घडला. याबाबत  विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सहायक  पोलिस  निरीक्षक साळुंके तपास करीत आहेत.

आजारास कंटाळून आत्महत्या

कुष्ठरोगाच्या आजारास कंटाळून नागेश बाळाप्पा हुवाळे (वय 40, रा., भारतनगर, कुमठा नाका) यांनी राहत्या घरात  लोखंडी अँगलला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. याबाबत प्रज्वल नागेश हुवाळे (वय 18) याने सदर बझार पोलिस ठाण्यास खबर दिली असून हवालदार पाडवी तपास करीत आहेत.