Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Solapur › सोलापुरात हौदात बुडून चिमुरडीचा मृत्यू

सोलापुरात हौदात बुडून चिमुरडीचा मृत्यू

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 11:17PMसोलापूर : प्रतिनिधी

सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासमोर हौदात बुडून स्वप्नाली शाहदेव धुमाळ (वय 3 वर्षे, रा. पिंपळगाव) या ऊसतोड मजुराच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास होटगी रोड येथील सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासमोर असणार्‍या हौदात चिमुरडीचे शरीर तरंगत असताना दिसले.

कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोब याची कल्पना पोलिसांना दिली. काही क्षणात अग्‍निशामक दलाचे जवानदेखील घटनास्थळी पोहोचले. स्वप्नाली धुमाळ यास पाण्यातून बाहेर काढून विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पो.कॉ. आर. एम. पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पाण्याचे हौद खोल असल्याने स्वप्नाली हिला पोहता आले नाही व बाहेरही निघता आले नाही.