होमपेज › Solapur › दृष्टी क्षीणता कार्यक्रमांतर्गत सव्वादोन कोटीची खरेदी

दृष्टी क्षीणता कार्यक्रमांतर्गत सव्वादोन कोटीची खरेदी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

दृष्टी क्षीणता आणि राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रूग्णांवरील उपचारासाठी विविध साहित्यांची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सव्वादोन कोटी रूपयांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरून सदरची खरेदी करून ती जिल्हा स्तरावर पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये ऑपरेटिंग मायक्रोस्कोप 7 नग : 1 कोटी 5 लाख रुपये, ए-स्कॅन 24 नग : 48 लाख रुपये, स्लाईट लॅम्प 24 नग : 12 लाख रुपये, कम्पलीट कॅट्रॅक्ट सेट 363 नग : 39 हजार 93 रुपये आणि केरॅटोमीटर 20 नग : 20 लाख रुपये अशी खरेदी होणार आहे. ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे व शासनाच्या पंचसूत्रींचा अवलंब करून खरेदी करणे आवश्यक आहे.