Mon, May 20, 2019 18:47होमपेज › Solapur › पोलिस नाईकवर खुनी हल्ला; पोलिस शिपायावर गुन्हा दाखल

पोलिस नाईकवर खुनी हल्ला; पोलिस शिपायावर गुन्हा दाखल

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 9:51PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून पोलिस नाईकवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करून घरातील साहित्य पेटवून देऊन नुकसान केल्याप्रकरणी  पोलिस शिपायाविरुद्ध सदर  बझार पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सात रस्ता परिसरातील शामानगर पोलिस वसाहतीमध्ये घडली. पोलिस   नाईक    सायबण्णा   नागनाथ कमळे (ब. नं. 1719, वय 34, रा. शामानगर पोलिसलाईन) यांच्या फिर्यादीवरून पोलिस शिपाई   पवनकुमार   राजेंद्र   राठोड (ब. नं. 1789,  नेमणूक पोलिस मुख्यालय, सोलापूर शहर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई राठोडविरुद्ध यापूर्वी पुण्यातील पिंपरी पोलिस ठाण्यात, तसेच सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास  शामानगर पोलिसलाईनमध्ये पोलिस शिपाई पवन राठोड याने पूर्ववैमनस्यातून पोलिस नाईक कमळे याच्या घरासमोर जाऊन धारदार कोयत्याने तुला मी खलास करतो असे म्हणून कमळे यांच्या अंगावर धावून  जाऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच राठोड याने कमळे यांच्या घरात घुसून घरातील गादी, बेडशीट यास आग लावून फ्रिज, टीव्ही तोडून घरातील साहित्यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान केले. यावेळी याठिकाणी आलेल्या नियत्रंण कक्ष व सदर बझार पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी राठोड यास पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या हाताला हिसका मारून राठोडने हत्यारासह पळ काढला. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.