Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Solapur › सोलापूर : व्यापाऱ्यांनी शहराचे  नुकसान केले : गवळी  (video)

सोलापूर : व्यापाऱ्यांनी शहराचे  नुकसान केले : गवळी (video)

Published On: Jul 12 2018 4:25PM | Last Updated: Jul 12 2018 4:20PM
सोलापूर : प्रतिनिधी

मोक्याच्या ठिकाणचे गाळे कवडीमोल दराने भाड्याने घेत व्यापाऱ्यांनी महापालिकेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे शहारातील विकास कामांना खीळ बसली,  असे प्रतिपादन रिप्ब्लीकन युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक गवळी यांनी केले. 

महापालिकेच्या गाळ्यांचा लिलाव करा,  या मागणीसाठी युवा मोर्चाच्या वतीने त्यांनी आज महानगपालिकेत धरणे आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना विकासकामांनाही निधी कमी पडत आहे.  अशावेळी गाळेधारक कवडीमोल भाडे देत पुन्हा गाळे त्यांच्याकडेच ठेवत आहे. त्यांचा स्वार्थीभाव लक्षात घेत त्यांना गाळ्यातून बाहेर काढा आणि बेरोजगारांना गाळे भाड्याने द्या. त्यामध्ये सामाजिन न्यायाप्रमाणे ५० टक्के गाळ्यांना आरक्षणानुसार भाड्याने द्यावेत असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी दीपक गवळी, मार्था आसादे,  विश्वास नागमोडे, अमर पवार, राजेश जाधव,शुभम बंगाळे, विलास सोनवणे, संजय भडकुंबे, अजय प्रक्षाळे, प्रकाश वाघमारे, सागर वडगांव आदी उपस्थित होते.