Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Solapur › सोलापूर : वैरागमध्‍ये मराठा आरक्षणासाठी ठिय्‍या आंदोलनास सुरुवात

सोलापूर : वैरागमध्‍ये मराठा आरक्षणासाठी ठिय्‍या आंदोलन

Published On: Jul 22 2018 2:32PM | Last Updated: Jul 22 2018 2:32PM 

वैराग:   प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज्याला आरक्षण द्यावे.  या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत ५८ मोर्चे काढण्यात आले.   मात्र शासनाने आरक्षण काही दिले नाही.  म्हणून झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी वैराग मधील छत्रपती शिवाजी चौकात आज रविवार, २२ जुलै पासून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

 गेल्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाज्याला आरक्षण देण्यात यावे म्हणून विविध प्रकारची शांततामय रितीने आंदोनलने करण्यात आली.  गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून गिनीज बुकात नोंद करण्यासारखे मोर्चे काढण्यात आले.  याबाबतीत मराठा समाज्याला अश्वासना शिवाय काहीही मिळाले नाही.

 मराठा समाज्याला आरक्षण देण्यात यावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ठिय्या आंदोलनांना सुरुवात झाली आहे.  त्याचाच एक भाग म्हणून वैराग मधील सकल मराठा समाज्याच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.  यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

दिवसभरात या आंदोलन स्थळी राजकीय ,सामाजिक ,व्यापारी, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  भेट देवून आंदोलनाला पाठिंबा दिला.