Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Solapur › मंत्रालयात शेतकरी आत्महत्या दुर्दैवी

मंत्रालयात शेतकरी आत्महत्या दुर्दैवी

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 8:52PMसोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन शेतकर्‍यांनी आत्महत्या करणे, हे सरकारचे दुर्दैव आहे, असे बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बसपा पूर्ण ताकदनिशी उतरुन सर्व जागा लढवणार असल्याची माहिती देण्यात आली. बहुजन समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरा सुरु केला असून रविवारी ते सोलापूर दौर्‍यावर होते. त्यानिमित्ताने माध्यमांशी संवाद साधला. 

सुरेश साखरे म्हणाले की, बीजेपी सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत जनतेची पिळवणूक झाली आहे. नोटाबंदीच्या काळात मोठी अराजकता माजली होती.त्यावेळी सरकारने योग्य उपाययोजना केल्या नाहीत. शिक्षणाचे बाजारीकरण करुन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या थांबवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या,

बेरोजगारी, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वतंत्र विदर्भ आदी समस्या घेऊन बसपा येणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत फुले, शाहू व आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधी निवडून पाठवू, असा विश्‍वास व्यक्त केला. सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार केवळ उद्योगपती धार्जिणी झाले आहे. या सरकारला सर्वसामान्यांचे काहीही पडले नाही, असा आरोप साखरे यांनी केला. यावेळी जनार्दन शिंदे, अशोक जानराव, अप्पासाहेब लोकरे, अ‍ॅड. संजीव सदाफुले, देवा उघडे, प्रा. खंदारे, बबलू गायकवाड, प्रवीण कांबळे, सोनकांबळे आदी उपस्थित होते.