Fri, Jul 19, 2019 22:57होमपेज › Solapur › सोलापूर : संगम येथे युवासैनिकांचा रास्ता रोको  

सोलापूर : संगम येथे युवासैनिकांचा रास्ता रोको  

Published On: Aug 12 2018 2:58PM | Last Updated: Aug 12 2018 1:55PMमाळीनगर  : प्रतिनिधी

पूर्व भागातील शेतकर्‍यांसाठी वरदायी असलेला उजनी उजवा कालवा पाटबंधारे खात्याच्या  दुर्लक्षामुळे भविष्यात मोठे संकट निर्माण करू शकतो.   उजनी उजवा कालवा भीमा  जलसेतूमधून क्षमतेपेक्षा जास्त पाण्याच्या  वहनाने हजारो लिटर पाणी  पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणामुळे  वाया जात असून स्थानिक पिकांचे व परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याने व सदरचा कालवा जर भविष्यात फुटला तर हजारो एकर जमिनीवरील पिके वाहून जाण्याची शक्यता असल्यामुळे   संगम (इंगळेवाडी) येथे  युवा सेनेतर्फे रस्ता रोको करण्यात आला व प्रशासनाने लेखी स्वरुपात आश्वासन  दिल्यानंतर सदरचा रस्ता रोको थांबविण्यात आला.

सदरचा रस्ता रोको युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे , युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे  , शिवसेना युवा नेते सोनू पराडे पाटिल ,  सोलापूर ग्राहक संरक्षण कक्षचे उपजिल्हा प्रमुख महादेव बंडगर ,  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी प्रशासनाच्या वतीने भीमा पाटबंधारे खात्याचे शाखधिकारी आय . टी  बनसोडे  व त्यांचे सहकारी यांनी निवेदन स्विकारले व लेखी स्वरूपात आश्वासन  दिले यावेळी अकलूज पोलिस स्टेशनच्या वतीने  चोख  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.