होमपेज › Solapur › सोलापूर : माळशिरस येथील ठिय्या आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : माळशिरस येथील ठिय्या आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद

Published On: Aug 06 2018 2:11PM | Last Updated: Aug 06 2018 2:11PMपानीव : वार्ताहर

सध्‍या महाराष्‍ट्रभर मराठा आंदोलनाची लाट पेटली आहे. त्‍यात सोलापूर जिल्‍हाही आघाडीवर आहे. त्‍याच पार्‍श्वभूमिवर माळशिरस तहसील कार्यालया समोरील मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास आजपासून सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या ठिय्या आंदोलनास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.  यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.

या आंदोलनास खा.विजयसिंह मोहिते- पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील -पानीवकर, मदनसिह मोहिते- पाटील, बाबाराजे देशमुख, शंकर देशमुख, उत्तमराव माने- शेंडगे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रिया नागणे, नंदकुमार घाडगे, नितीन थिटे,रवींद्र पवार, हणमंत साळुंखे आदींनी आपली हजेरी लावून पाठींबा दर्शविला आहे.