Sun, Sep 23, 2018 18:47होमपेज › Solapur › श्रीमंतयोगी चे पुरस्कार जाहीर

श्रीमंतयोगी चे पुरस्कार जाहीर

Published On: Mar 06 2018 8:02PM | Last Updated: Mar 06 2018 7:28PMसोलापूर : प्रतिनिधी

महिलादिनाचे औचित्य साधून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या 8 महिला अधिकारी, कर्मचार्‍यांना आदर्श महिला पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती महेश कासट यांनी दिली. 11 मार्च रोजी समाजकल्याण केंद्र सभागृहात रविवार, 11 मार्च रोजी दु. 1 वा. हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई फौंडेशनच्या शुभदा देशपांडे, वर्षाताई विभुते, तेजस्विनी राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आदर्श महिला पुरस्काराचे मानकरी अ‍ॅड. प्रेमलता व्यास, वैशाली शिंदे (सहायक पोलिस आयुक्त), प्रियदर्शनी कादे, डॉ. वैशाली शिरशेट्टी, साधना शिंदे, तृप्ती दुर्गे, कल्पना पूल, अनुराधा कवेकर आदी आठ मान्यवर महिलांचा पुरस्काराने गौरव होणार आहे. या सर्व महिलांनी आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळेच त्यांची यासाठी निवड केली आहे. या पुरस्कारास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक महेश कासट यांनी केले आहे.