होमपेज › Solapur › सोलापूर : शिवसेना नगरसेवकाची पत्नी दागिने चोर

सोलापूर : शिवसेना नगरसेवकाची पत्नी दागिने चोर

Published On: Mar 12 2018 7:13PM | Last Updated: Mar 12 2018 7:13PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीसह तीन महिलांना कर्नाटक पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली आहे. या तीनही महिलांना सोलापुरात आणून कर्नाटक पोलिसांनी विविध सराफांकडून सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

उषा खांडेकर, मीना बजरंग जाधव आणि तिपव्वा लक्ष्मण उर्फ काका जाधव (रा. सेटलमेंट, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तिपव्वा जाधव ही महिला सोलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची पत्नी आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील दावणगिरी येथे एका मंदिरामध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीच्या आरोपाखाली उषा खांडेकर, मीना बजरंग जाधव आणि तिपव्वा लक्ष्मण उर्फ काका जाधव या तीनही महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

दरम्यान, नगरसेवक जाधव यांनाही यात आरोपी केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.