Fri, Jan 18, 2019 06:46होमपेज › Solapur › सोलापूर : कोर्टीत दोन गटात हाणामारी; एक ठार

सोलापूर : कोर्टीत दोन गटात हाणामारी; एक ठार

Published On: Apr 11 2018 9:16AM | Last Updated: Apr 11 2018 9:19AMपंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टीत ( ता पंढरपूर )  येथे मंगळवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला. मोहन लक्ष्मण हाके असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. 

कोर्टीत येथे मंगळवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हाके आणि ढाळे या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये मोहन हाके हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान हाके यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्रीच ५ जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Tags : solapur, solapur news, pandharpur, koroti crime