Sat, Aug 24, 2019 21:26होमपेज › Solapur › महापालिकेच्या ताफ्यात शववाहिका, कैलासरथ

महापालिकेच्या ताफ्यात शववाहिका, कैलासरथ

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 8:49PM

बुकमार्क करा
सोलापूर: प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागात एक नवीन शववाहिका व कैलासरथ दाखल झाले. त्याचे विधीवत पूजन करण्यात आले. या वाहनांचे पूजन महापालिकेच्या आवारात महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, आरोग्याधिकारी डॉ. बी.टी. दूधभाते, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, नगरसेवक श्रीनिवास करली, सुनील कामाठी आदी उपस्थित होते. मनपाकडे शववाहिकांची कमरता असल्याने नवीन वाहिका घेण्यात आली आहे. आणखीन चार वाहिका घेण्यात येणार आहेत.

कैलासरथ मनपाच्या ताफ्यात पहिल्यांदाच दाखल झाले आहे.  हे वाहन कोणाला व किती दरात उपलब्ध करुन द्यावयाचे आहे याचे धोरण अद्याप ठरले नाही, अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असणार्‍या रुग्णवाहिका आणि शववाहिका अत्यंत जुन्या झाल्यामुळे त्यांना काही वाहनांची गरज होती. त्यामुळे ही वाहने खरेदी केल्यानंतर सोलापूर आरोग्य विभागाला थोडेसे बळ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.