Sun, Nov 18, 2018 20:41होमपेज › Solapur › सोलापूर : आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन

सोलापूर : आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन

Published On: Aug 04 2018 5:49PM | Last Updated: Aug 04 2018 5:48PMमोहोळ : वार्ताहर

धनगड हि जात महाराष्ट्रात कुठेही अस्तीत्वात नाही. मात्र सरकार सदर जात अस्तीत्वात असल्याची आकडेवारी देवून धनगर समाजावर अन्याय करत आहे. त्यामुळे या अन्याया विरोधात धनगर बांधव रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी मागणी करत आहेत.  या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसीलसमोर शनिवार, ४ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. 

सन २०११ च्या जन गणनेनुसार महाराष्ट्रात ४३०५८ व सोलापूर जिल्ह्यात १६५९ एवढी धनगड जमात राहत असल्याची माहीती शासनाच्या दप्तरी आहे. या संदर्भात जात पडताळणी समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या  माहीती घेतली. त्यावेळी धनगड जमातीचा एकही व्यक्ती अस्तीत्वात नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. मात्र भाजप शिवसेनेचे सरकार धनगर आरक्षणाला विलंब करीत आहे. त्यामुळे धनगर बांधवांमध्ये नाराजीचा सुरु आहे. 

यावेळी पं.सं. सभापती समता गावडे, यशवंत नरुटे, रामचंद्र खांडेकर, नागनाथ क्षिरसागर, कृष्णदेव वाघमोडे, संजय आण्णा क्षिरसागर, सुनील  पाटील, सज्जन पाटील, मालती टेळे, धनाजी गावडे, अशोक बरकडे, अनंता नागणकेरी, अतुल गावडे, सुशील क्षिरसागर, माणिक गावडे, गणेश गावडे, सागर लेंगरे, भिमराव जरग, राजाभाऊ सलगर, आदीसह बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.