Mon, May 20, 2019 18:48होमपेज › Solapur › सोलापूर : सांगोला येथे अन्न भेसळ प्रशासनाची मोठी कारवाई

सोलापूर : सांगोला येथे अन्न भेसळ प्रशासनाची मोठी कारवाई

Published On: Sep 04 2018 11:32AM | Last Updated: Sep 04 2018 11:05AMसांगोला: प्रतिनिधी

गोपनीय माहितीच्‍या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने नाझरा (ता. सांगोला) येथील बाळू रायचुरे, यांच्या संग्राम चौकातील गोडावूनवर अचानक छापा टाकला. या छाप्यात सुमारे २ लाख १२ हजार ८१० रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्‍नपदार्थ साठा (गुटखा) जप्‍त केला. ही कारवाई सोमवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्‍यात आली. ही कारवाई सहाय्यक आयुक्‍त प्रदीप राऊत यांच्‍या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांच्या पथकाने केली. 

नाझरे (ता. सांगोला) येथे प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा केल्याची गोपनीय माहिती सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांच्या पथकाने सोमवार ३ सप्टेंबर रोजी नाझरा (ता. सांगोला) येथील संग्राम चौकातील बाळू रायचुरे यांच्या गोडावूनवर अचानक छापा टाकला. गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा सुमारे २ लाख १२ हजार ८१० रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. गोडावूनचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठविण्यासाठी पुनर्वापर होऊ नये म्हणून गोडावून सील करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्‍त (अन्न) प्रदीप राऊत यांच्‍या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांच्या पथकाने कारवाई करत सदरचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून गोडावून सील करण्यात आले आहे.