Fri, Apr 26, 2019 15:36होमपेज › Solapur › मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल सादर करा

मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल सादर करा

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 9:06PM

बुकमार्क करा

सोलापूर ः प्रतिनिधी

मनपा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांना येथील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून  होणार्‍या मानसिक व आर्थिक कंत्राटी कर्मचार्‍यांना  मुद्देनिहाय चौकशी करावी आणि त्याचा अहवाल  करण्यासंबंधीचे पत्र मनपा आयुक्तांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांनी पाठवले आहे. मात्र यामध्ये गौडबंगाल असून ते पत्र आयुक्तांपर्यंत पोहोचू न देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न यातील अधिकार्‍यांनी केल्याचे बोलले जात आहे.

मनपा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील सर्वच कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांनी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहेत याबद्दल थेट राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे संचालक यांच्याकडे लेखी तक्रारींचा पाढा लिहून पाठवला. त्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालक डॉ. दीप्ती पाटील यांनी आयुक्तांना मुद्देनिहाय चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना 27  नोव्हेंबर 2017 रोजी दिल्या आहेत. मात्र याची चौकशी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते यांनी नेमली आहे.

त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना चौकशी का नेमली नाही की त्यांचा या गैरप्रकारास पाठिंबा आहे किंवा त्यांना या पत्राची खबरच लागू दिली नाही, असे विविध प्रश्‍न येथील अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांकडून चर्चिले जात आहेत. महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील एकूण 38 अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी 36 जणांनी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी नाहक त्रास देत असल्याचे लेखी पत्रात म्हटले होते. याची दखल राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालक डॉ. दीप्ती पाटील यांनी घेतली आहे. त्यावर त्यांनी मुद्देनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.