Sun, May 26, 2019 15:00होमपेज › Solapur › सोलापूर : भाजप कार्यकर्त्यांना आश्रू अनावर

सोलापूर : भाजप कार्यकर्त्यांना आश्रू अनावर

Published On: Aug 17 2018 12:35PM | Last Updated: Aug 17 2018 12:35PMसोलापूर : प्रतिनिधी 

भाजपचे पहिले अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सोलापूरवर शोककळा पसरली आहे. अनेक कार्यकर्त्यांना अटलजींच्या निधनाने अश्रू अनावर झाले.  आज सकाळी १० वाजल्यापासून  भाजप कार्यालयात शेकडो कार्यकर्ते जमले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली.

सुमारे अर्धा तास मौन पाळून साऱ्यांनी अटलजींचे स्मरण केले. आज कुणीही भाषण केले नसले तरी त्यांच्या सोलापूरातील  आठवणींनी अनेकांना हुंदका आवरता येत नव्हता.  यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, दत्ता गणपा, हेमंत पिंगळे, शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.

शनिवारी शोकसभा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त शनिवारी (१८ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.