होमपेज › Solapur › मनपाकडून हॉटेल कलामच्या अवैध बांधकामाचा पाडाव

मनपाकडून हॉटेल कलामच्या अवैध बांधकामाचा पाडाव

Published On: Jan 05 2018 12:57AM | Last Updated: Jan 04 2018 8:58PM

बुकमार्क करा
सोलापूर :  प्रतिनिधी

विजापूर रोडवरील हॉटेल कलामच्या अनधिकृत बांधकामावर गुरूवारी महापालिकेच्या पथकाने हातोडा घातला. स्टोअररुमच्या जागेत हे हॉटेल उभारण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून शहरातील व्यावसायिक आस्थापना असलेल्या मिळकतींवर कारवाई करण्यात येत आहे.  यामध्ये हॉटेल, हॉस्पिटल, मंगल कार्यालय आदींचा समावेश आहे. फ्रंट-साईड-रेअर मार्जिन, पार्किंग तसेच स्टोअररुमच्या जागेचा गैरवापर करणार्‍या मिळकतींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू  आहे. या मोहिमेंतर्गत विजापूर रोडवरील अर्जुन टॉवरनजिकच्या हॉटेल कलामवर कारवाई करण्यात आली. इमारतीच्या स्टोअररुमच्या जागेत हे हॉटेल उभारण्यात आले होते.

यामध्ये हॉटेलबरोबरच किचन, लोखंडी जीना तसेच पत्राशेड उभारण्यात आले होते. जेसीबी, कटरच्या सहाय्याने हे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. शहरातील अनेक मंगल कार्यालये ही मनपाचे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आली आहेत. अशा सुमारे 45 मंगल कार्यालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. व्यावसायिक मिळकतींवर कारवाईची मोहीम निरंतर सुरु राहणार आहे.