Sun, Apr 21, 2019 03:59होमपेज › Solapur › रंगांच्या उत्सवात रंगले सोलापूरकर

रंगांच्या उत्सवात रंगले सोलापूरकर

Published On: Mar 06 2018 8:02PM | Last Updated: Mar 06 2018 8:02PMसोलापूर : प्रतिनिधी

लहान मुलांच्या रंगीबिरंगी पिचकार्‍या. रंगीबिरंगी पाण्याचे फुगे. शाळकरी मुलांमध्येही दोन दिवसांपासूनची रंगपंचमी आणि आणि युवकांमध्येही इको-फे्ंरडलीची क्रेझ अशा विविधप्रकारे सोलापूरकर रंगपंचमीनिमित्त रंगांच्या उत्सवात रंगल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. बालके, शाळकरी मुले, कॉलेजमधील युवक ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना आनंद देणारा सण म्हणून रंगपंचमीची ओळख आहे.  यानिमित्ताने ओल्या व कोरड्या रंगांची उधळण सर्वत्र पाहायला मिळाली. अनेकांनी फार्महाऊस, मित्रांच्या शेतात पार्ट्यांचा बेत करत  एक वेगळा रंग दिला आणि त्याचा आनंद लुटला.  

इको-फे्रंडली रंगपंचमीचा वाढता प्रभाव

रंगपंचमीनिमित्त पाण्याची होणारी नासाडी, रासायनिक रंग, त्यामुळे त्वचेचे होणारे आजार व त्याचे दुष्परिणाम याला टाळण्यासाठी सोशल मीडियावर इको-फे्रंडली रंगपंचमीचा प्रचार व प्रसार आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी बर्‍याच युवक व नागरिकांनी कृतीतून इको-फे्रंडली रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर इको-फे्रंडली रंगपंचमीचे फोटो अपलोड केल्याचे दिसून आले. ज्यातून इको-फे्रंडली रंगपंचमीचा वाढता प्रभाव दिसून आला. 

सोशल मीडियावरील रंगपंचमीचे रंग

  1.  रंगो से डर नही लगता साहब, रंग बदलने वालोंसे डर लगता है
  2.  बुरा न मानो होली है
  3.  10 वी, 12 वीच्या परीक्षा सुरू आहेत, विद्यार्थ्यांना सहकार्य करा.
  4.  रंग काय लावताय, तो तर उद्या जाईल. लावायचाच तर जीव लावा, तो आयुष्यभर राहील.

अशाप्रकारे सोशल मीडियावर विविध टिपण्या करत, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स ठेवत सोशल मीडियावरही रंगपंचमीचे रंग दिसून येत आहेत.